जायकवाडीच्या फुगवट्यावर शेवगाव ते पैठण या पट्ट्यातील उसावर थोडेथोडके नाही तर 22 ते 25 कारखाने चालतात. उसाची टंचाई असली कि, पळवापळवी, जास्त दर अन सुकाळ असला कि कमी दर. चालू गळीत हंगामाला सुरवात होवून पंधरा दिवसांपूर्वी तोडणी सुरु झाली. तरी पहिला हप्ता किती देणार याचे नाव घेईना. त्यातून तयार झालेल्या असंतोषाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फुंकर घातली. प्रशासनालाही खासगी व सहकारी साखर कारखानदार जुमानायलाच तयार नव्हते. त्यातच पोलिसांनी दडपशाही सुरु केल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळून प्रकरण गोळीबारापर्यंत गेले. शेतकरी 3100 रुपयांचा भाव मागत होते. पण ढिम्म प्रशासन काहीच उत्तर देत नव्हते अखेर लोकांनी रस्ता अडवणूक सुरु करून दगडफेक सुरु केली. पोलिसांना आंदोलकांना रोखण्यासाठी आश्रुधुरनंतर रबरी गोळ्या मग गोळीबार
करावा लागला ह्याच 2 शेतकरी जखमी झाले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews